पुणे दि,२० : – जग्वार कंपनीची कार रिपेअरिंगच्या पैशाच्या स्वरूपात सुमारे ५ लाख रुपये मागणी करून तसेच न दिल्याने आठ जणांनी एकाची नग्न करून धिंड काढली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आठ जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हि घटना महंमदवाडी आणि वानवडी मिलिट्री परिसरात शनिवारी (दि. 16) मध्यरात्री 3 च्या सुमारास घडली.
याबाबत राज भोगप्पा शिंगे ( वय ३१, रा. सध्या येवलेवाडी, ता. हवेली, जि. पुणे, मूळगाव – रा. जळकीगाव, ता. आळंद, जि. गुलबर्ग) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी सेहर गुलाम गौस शेख (वय ३६), मतीन उर्फ नोशद खान (वय २४, दोघेही राहणार -भवानी पेठ, पुणे),उबेद अली शेख (वय २४, रा. पर्वती, पुणे) आणि सिद्दीकी इद्रिस शेख (वय २८, भवानी पेठ, पुणे) अशी अटक केली असून आणखी तिघेजण फरार आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सेहर गुलाम गौस शेख यांचा वाहन विक्रीचा व्यवसाय आहे. तो त्याच्या ओळखीने फिर्यादी यास इंपोर्टेड वाहने रिपेअरिंगसाठी देत असे. तसेच यातून त्याने कार रिपेअरिंगच्या पैशाच्या स्वरूपात कमिशन मागणी करीत.आसे त्याने शनिवारी (दि. १६) त्याने एक वाहन फिर्यादी याकडे रिपेअरिंगसाठी दिले होते. या कार रिपेअरिंगच्या कमिशनच्या स्वरूपात फिर्यादीकडे सुमारे साडे चार लाख रुपये मागणी केली.होती तसेच यातून 16 नोव्हेंबरला आठ तरुणांनी कोंढवा येथील गॅरेजमधून फिर्यादीस उचलून हडपसर आणि खराडी परिसरात नेले. तिथं त्याचे कपडे उतरवून फिर्यादीस लाथा-बुक्क्याने मारहाण करत नग्नावस्थेत धिंड काढली. तसेच फिर्यादीच्या अंगावर विविध ठिकाणी सिगारेटचे चटके देऊन पहाटे साडे तीन वाजता पुन्हा त्याला गॅरेजजवळ सोडले.या घटनेच्या दुसऱ्या दिवशी फिर्यादीने कोंढवा पोलीस स्टेशन गाठले. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत नव्हते. पोलीस हे प्रकरण दडपत असताना हा व्हिडीओ माध्यमांच्या हाती लागला. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करायला पोलीस सरसावले. त्यानुसार याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.