पुणे दि,११ :- पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर पुणे जिल्हा येथ कैलास वासी चांगदेव सुखदेव वाळेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह-भ-प महामंडलेश्वर रामकृष्ण दास लहवितकर महाराज यांची कीर्तन सेवा संपन्न झाली या कार्यक्रमासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज ह भ प बापूसाहेब महाराज देहूकर व इंदापूर तालुका मार्केट कमिटीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे उपस्थित होते कैलास वासी चांगदेव वाळेकर यांना प्रथम पुण्यस्मरणा निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली मळवली कर बापूसाहेब देहूकर महाराज पुढे म्हणाले की शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन चांगल्या प्रकारे शेती करून आपल्या मुलांना शेती बरोबर व्यवसायांमध्ये प्रोत्साहन केले स्वखर्चाने सप्ताहाचे पारायण त्यांनी दोन वेळा केले या महान व्यक्तीस त्यांनी व लहवितकर महाराज वारकरी संप्रदाय यांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कीर्तन सेवा संपन्न झाली या कार्यक्रमासाठी त्यांचे चिरंजीव अशोक वाळेकर व नवनाथ वाळेकर व सर्व त्यांचे कुटुंब यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले व पंचक्रोशीतील ग्रामस्थ भजनी मंडळ वारकरी संप्रदायीक व विणेकरी महादेव सुतार मृदंग वादक रामभाऊ शेळके सतिष घोगरे महेश सुतार पंचक्रोशीतील देहूकर फडावरील टणू गणेश वाडी शिंदे वस्ती गारअकोले गोंदी सराटी गिरवी संगम नरसिंहपुर पिंपरी बुद्रुक सुरवड हे या परिसरातील उपस्थित राहून कार्यक्रम संपन्न झाला
बाळासाहेब सुतार, निरा तालुका इंदापूर :- प्रतिनिधी