तळेगाव दाभाडे दि,११:-सोशल मिडियावर टाकलेल्या वर्चस्वाच्या पोस्टवरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये तीन कारची तोडफोड करण्यात आली असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज, सोमवारी (दि. 11) दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव स्टेशन येथील जनरल हॉस्टपील जवळ घडली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कांब्रे कामशेत येथील देवा गायकवाड आणि हरण्येश्वरवाडी, तळेगाव स्टेशन येथील सांडभोर या दोन गटात दुपारी दोनच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. व्हॉट्सअपवर वर्चस्वाच्या पोस्ट वरून सुरुवातीला वाद झाला. सांडभोर गटाने गायकवाड गटाला तळेगाव स्टेशन येथे बोलावून घेतले. गायकवाड गट तळेगाव स्टेशन येथे आला असता दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत योगेश गायकवाड गंभीर जखमी झाला त्याच्यावर तळेगाव
येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.असुन दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी शस्त्र काढल्याची देखील माहिती मिळत आहे.घटना घडल्यानंतर तळेगावच्या माजी नगराध्यक्षांनी तात्काळ तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यास फोन केला. मात्र, तळेगाव दाभाडे पोलिसांनी त्याला उत्तर न दिल्याने ही घटना पोलिसांना समजण्यासाठी विलंब झाला. दरम्यान, वाद विकोपाला जाऊन गंभीर हाणामारी झाली. त्यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. या वादामागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याचेही सांगण्यात येत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
सतिश सदाशिव गाडे प्रतिनिधी वडगाव मावळ पुणे