खंडाळा दि,०४:- मुबंई पुणे मार्गावर बोरघाटात बसचा आज सकाळी अपघात या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.तरअंदाजे 30 प्रवासी यामध्ये जखमी झाले आहेत.बोरघाटात गारमाळ पाँइंट जवळच्या वळणावर बसचा ताबा सुटला आणि बस दरीत कोसळली.आसून दरम्यान देवदुत, महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी टिमचे मदतकार्य सुरु आहे. या अपघातात 2 वर्षाचा चिमुकला, एक युवती, एक पुरुष एक महीला जागीच ठार झाले आहेत. तर अंदाजे 30 प्रवासी यामध्ये जखमी झाले आहेत. जखमींना एमजीएम कामोठे, खोपोली रुग्णालय, पवना रुग्णालय, लोकमान्य रुग्णालय येथे जखमींना हलवण्यात आले आहे.
सतिश सदाशिव गाडे वडगाव मावळ पुणे प्रतिनिधी