मावळ दि ०३ :-मावळ तालुका कृषी अधिकारी देवेंद्रनाथ ढगे व कर्मचा-यांकडून मावळातील नवलाख उंब्रे शेटेवस्ती, चावसरवस्ती, कदमवाडी, कोयतेवस्ती येथे परतीच्या पाऊसामुळे झालेल्या भात पिकांच्या नुकसानीचे आज पंचनामे करण्यात आले.यामध्ये भात पिक सडणे व इतर बागायती पिके नुकसानी संबंधी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.असुन संबंधित लाभार्थ्यांकडून आधार कार्ड, बँक पासबुक प्रत व पंचनामा अर्ज कृषी अधिकारी प्रियंका पाटील भरून घेत आहेत.अवकाळी पावसाने मावळातील शेतकर्यांचे झालेले नुकसान आणि राज्य सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना याचा सविस्तर आढावा घेऊन त्यांनी प्रत्यक्ष नुकसान दाखवून अर्ज भरून दयावा,असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मावळ देंव्रेद्रनाथ ढगे यांनी केले व योग्य ती भरपाई मिळेल, असे त्यांनी सांगितले.यावेळी पी एस पाटील कृषी अधिकारी, नवलाख उंबरेचे माजी सरपंच एकनाथ शेटे,उंबरेचे माजी सरपंच एकनाथ शेटे, इंदाराम शेटे, विजय शेटे, सागर एकनाथ शेटे, ज्ञानेश्वर शेटे, महेश शेटे, संतोष शेटे सर, विक्रम शेटे, रामनाथ शेटे, तंटामुक्ती अध्यक्ष दिनकर शेटे, बाबाजी शेटे, राहूल शेटे, दिलीप शेटे आदी व सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भात पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी शेतकरी उपस्थित होते
सतिश सदाशिव गाडे वडगाव मावळ पुणे प्रतिनिधी