पुणे दि३० :- लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 32 34 डी २ पर्यावरण विभागातर्फे शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणपतीचे कार्यशाळा सौ कॅप्टन शिवरामपंत दामले प्रशालेत घेण्यात आली. यामध्ये दोनशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला. आर्टिस्ट कविता चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुलांनी दगडूशेठ, लालबाग राजा, टिटवाळा, सिंहासनावर बसलेले, खंडोबा इत्यादी प्रकारच्या मूर्ती बनवल्या.
लायन्स क्लबचे पर्यावरण मंत्री डॉक्टर प्रसाद खंडागळे यांनी मार्गदर्शन केले तसेच शाडूच्या मूर्ती नंतर पाण्यात विसर्जन करत कुंडीत फुलांच्या बिया टाकून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी लायन्स क्लब सारसबाग अध्यक्ष नितीन मेहता श्री शहा, श्री पटणे, प्राचार्य वसईकर, हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
गणपती बसणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.