मुंबई दि,३० :- संपुर्ण महाराष्ट्रला आपल्या आवाजाने आख्या तरुण तरुणींना गाण्यावर ठेका धरून नाचायला लावणारे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी ‘शिट्टी वाजली’, ‘कोंबडी पळाली’, ‘जवा नवीन पोपट हा’ बघ बघ सखे कस गुबगुब वाजताय, येऊ कशी मी नांदायला यांसारखी हिट गाणी दिली आहेत. यांसारख्या गाण्यांमुळे ते संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी पक्ष सोडून सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यानंतर आता गायक आनंद शिंदे यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर लगेचच त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मनोज संसारे यांनी ही माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघापैकी मोहोळ आणि माळशिरस दोन विधानसभा राखीव मतदारसंघ आहेत. या दोन मतदारसंघापैकी एका मतदारसंघातून आनंद शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
आठवड्याभराआधी आनंद शिंदे आणि त्यांच्या मुलाला शिवसेनेतून विधानसभेतून निवडणूक लढवावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑफिर दिली होती. आठवड्याभरापूर्वी मातोश्रीवर याबाबत बैठक झाल्याची माहिती होती. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी पिंपरी आणि मोहोळ या आरक्षित विधानसभा मतदारसंघाचं तिकीट देण्याची तयारी दर्शवली होती. आनंद शिंदेंनी मात्र त्या बैठकीत आपल्याला निवडणूक लढवण्यात रस नसल्याचे स्पष्ट केले होते. याशिवाय राष्ट्रवादी आणि आरपीआयकडूनही प्रस्ताव आला असल्याची माहिती होती.
बाळू राऊत प्रतिनिधी