मुंबई दि,२३ :- शालेय विद्यार्थ्यांना अवकाशा विषयी माहिती मिळावी म्हणून चांद्रयान २ ही मोहीम चांद्रयान १ नंंतरची भारताची दुसरी चंंद्रमोहीम आहे. हेे यान इस्रोने बनवले असून, ते दिनांक २२ जुुुलै २०१९ रोजी श्रीहरीकोटा अवकाश केेंंद्रातूूून Geosynchronous Satellite Launch Vehicle मार्क ३ (GSLV MK III -M1)द्वारे प्रक्षेपित करण्यात आले. या यानात कक्षाभ्रमर, लँडर व रोव्हर यांचा समावेश असून त्यांना देशातल्या देशात विकसित करण्यात आले आहे.
अवकाश कार्यक्रमा बद्दल विद्यार्थ्यांमध्येही जागृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी इस्रो मार्फत ऑनलाईन प्रश्न मंजूषा स्पर्धा घेण्यात येत आहे. येत्या २५ ऑगस्ट पर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. या स्पर्धेत उत्तम गुण मिळविणाऱ्या प्रत्येक राज्यातील गुणानुक्रमे इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत बंगळुरू इस्रो येथे चांद्रयान २ च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण पाहण्याचे संधी उपलब्ध होणार आहे ऑनलाईन प्रश्न मंजूषा http://quiz. Mygov.in/quiz/online-space-quiz/येथे उपलब्ध आहे. ऑनलाइन प्रश्न उत्तरात १० मिनिटाच्या कालावधीत २० प्रश्न सोडावायचे आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी पालकांना मदत करण्याची मुभा देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना mygov.in या पोर्टलवर नाव नोंदणी करण्यासाठी एस एम एस सेवेद्वारे आपले लॉगीन व पासवर्ड तयार करून घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या साठी आपल्या मोबाइल वरुण. ७७३८२९९८९९ या क्रमांकावर आपण MYGOV युजरनेम असा एस एम एस पाठवून आपला लॉगीन तपशील सेवेद्वारे प्राप्त होईल
बाळू राऊत प्रतिनिधी