पिंपरी. दि ६ : –पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी, वाकड व पिंपळे निलख या पुरग्रस्त परिसराची व बचाव छावण्याची पाहणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केली.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांना पुर आला आहे. त्यामुळे नदी लगतच्या परिसरासह विविध ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी गेले. अशा पुरग्रस्तांना महानगरपालिकेने निवासाची व भोजनाची व्यवस्था केली आहे. सांगवी परिसरात पूरामध्ये बाधीत झालेल्या नागरिकांना सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेमध्ये स्थलांतर करून त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे. या परिसराची त्यांनी आज पाहणी केली. तसेच पुराने बाधित नागरिकांशी संवाद साधला.
आज या पाहणी दौऱ्यामध्ये त्यांचे समवेत राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते नाना काटे,शिवसेना गटनेते राहुल कलाटे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, शहर अभियंता राजन पाटील, प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसद्स्य चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, संदिप कस्पटे, हर्षल ढोरे, तुषार कामठे, संतोष कांबळे, नगरसदस्या उषा ढोरे, सिमा चौगुले, आरती चौंधे, माधवी राजापुरे, शारदा सोनवणे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, आदि मान्यवर सहभागी होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व विभाग प्रमुखांना व प्रशासनाला पुर नियंत्रण उपाययोजनेबाबत तसेच पुरग्रस्त नागरिकांना मदतीसाठी तात्काळ उपाय योजना कराव्यात अशा सुचना दिल्या.
तसेच महानगरपालिकेकडून पुराने बाधित नागरिकांना देण्यात येणाऱ्या निवासाची, भोजनाची व आरोग्य तपासणी, सुविधांबाबतची माहिती महापौर राहुल जाधव व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी दिली. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विषयक कामकाजाची माहितीही यावेळी देण्यात आली.