मुंबई दि,०५:- आधार कार्ड वर चुकलेली माहिती म्हणजे की मोबाईल नंबर हे तुम्ही बिना कागदपत्र जोडताच करू शकता. मात्र आधार कार्ड वरील जन्मतारीख बदलावयाची असल्यास त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांचा फोटो सबमिट करावा लागेल.
कसा करायचा आधार कार्ड मध्ये फेरबदल ?
सर्वांत अगोदर सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल वर जाऊन त्या पोर्टल वर आपला आधार क्रमांक लिहावा. जसा आपण पोर्टल वर आधार क्रमांक टाकू तसा आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर otp येईल ज्या वेळी हा आलेला otp पोर्टल वर टाकू तरच ते लॉगीन होईल. लॉगिन केल्यावर अपडेट पोर्टलवर जाऊन डेटा अपडेट करा. मग आधार अपडेट फॉर्म उघडेल ह्या फॉर्म मधली नको असलेली माहिती काढून टाका त्या ऐवजी आपणास हवी असणारी माहिती टाकून सबमिट बटन दाबल्यास आधार कार्ड आपोआप अपडेट होईल.
कोण – कोणती कागदपत्रे सबमिट करावी लागतील ?
आधार कार्ड अपडेट साठी त्या संदर्भात लागणारी कागदपत्रे द्यावी लागणार असून ती बंधनकारक आहेत या साठी मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड,रेशन कार्ड , ड्राविंग लायसन्स पीडिए, फोटो कार्ड ही कागतपत्र चालणार आहे.
आधार कार्ड च्या वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा..
wwww.adhar.org.gov.in
बाळू राऊत प्रतिनिधी