पुणे दि.०२ :- हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कच्या वाहतूक, रस्ते व विविध अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्राकार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल आदींसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, हिंजवडी, माणचे ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सुस ते नांदे चांदे रस्ता, घोटवडे फाटा ते हिंजवडी टप्पा 3 टी जंक्शन, वाकड येथील सर्व्हिस रोड पूल, हिंजवडी -माण येथील वाहतूक समस्या, प्रलंबित रस्त्यांची कामे, प्रस्तावित रस्त्यांचे प्रश्न, प्रमुख पायाभूत सुविधा, पार्किंग, वाहतूक व सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन व विविध अडचणीसंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा झाली.