नगर दि ११:- -छावा क्रांती वीर सेना महाराष्ट्र च्या वतीने.नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा ते शेवगाव रोड वर दिवसेंदिवस अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालाआहे.अनेक हाॅटेल धाबे यावर उशिरा पर्यंत अवैध दारू विक्री केली जाते.दारू माफीयांच्या माध्यमातून अवैध पने दारू विक्री केली जाते.त्यामुळे अनेक कुंटुंबे उध्वस्त होत असून मोठ्या प्रमाणावर युवा वर्ग,गुन्हे गारीकडे वळत आहे.अपघातांचे प्रमाण वाढले आहे.म्हणून छावाचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब काळे,नेवासा तालुका युवा अध्यक्ष कमलेश नवले पाटील,संघटक पप्पू बोधक,संपर्क प्रमुख आदेश खाटीक, विशाल तुपे,नितीन आरगडे,प्रविण ढाकणे,किशोर नागरे,सागर चव्हाण,अक्षय आरगडे,ह भ प राजेंद्र पाटोळे,ह भ प यादव महाराज,म्हस्के सर,सलिम सय्यद,अॅड.महेश शिंदे राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली जिल्हा अध्यक्ष आंदिच्याशिष्टमंडळाचे जिल्हा पोलीस अधिक्षक ईशू सिंधु साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन अवैध धंदे ताक्राळ बंद करण्याबाबत निवेदन देवुन चर्चा केली.अवैध धंदे ताक्राळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पञाने देण्यात आला