पुणे दि ०५ :- पुणे येथे अँक्वाचिल सिस्टिम इंडिया ‘प्रा लि. ही कंपनी इंडस्ट्रीयल एअर कंडीशनर मशीन नवीन किंवा जुन्या इमारतीत बसविण्याचे काम करते. कंपनीस रूबी हॉल हॉस्पीटल, पुणे येथील सुपर
स्पेशालिटी कॅन्सर या इमारतीमध्ये एअर कंडीशनर मशीन बसविण्याचे काम सप्टेंबर, २०१८ मिळालेले होते कंपनीमधील कामगारांनी रूबी हॉल हॉस्पीटल, पुणे येथील सुपर स्पेशालिटी कॅन्सर या इमारतीमध्ये एअर कंडीशनर मशीन बसविण्याचे काम सुरू केले. होते त्या ठिकाणी काम चालू असताना बाबू ननावरे, गोविंद गायकवाड, गौतम जगदाळे हे आले व कंपनीचे कामगार यांना काम कोणाचे आहे, तुम्हाला माथाडीचे ३५, हजार रूपये.
द्यावे लागतील, नाहीतर काम बंद करा असे सांगितले. त्यावेळी त्यांना कामगार यांनी तुम्ही माथाडीचे कोणतेही काम करीत
नाहीत, तुम्हाला पैसे का दयायचे, असे सांगितले असता त्यांनी नमूद कामगारांना तुम्हाला व्यवस्थित काम करायचे का, मरायचे आहे, अशी धमकी देवून त्यांनी कंपनीचे काम बंद पाडले. त्यानंतर माथाडीचे लोकांना कंपनीचे संचालक यांनी घाबरून ३५ ,हजार . दिले. त्यानंतर
काम परत सुरू केले. त्यानंतर माथाडीचे लोक हे परत काही दिवसांनी रूबी हॉल येथे येवून कंपनीचे काम बंद पाडून ९० हजार रूपये.व ३५ हजार रूपये. ची माथाडीचे नावाने खंडणीची मागणी करून, कंपनीचे
कामगारांना दमदाटी करून, जीवे मारण्याची धमकी देवून एकूण १, लाख ६० हजार रूपये.ची खंडणी स्वरूपात वसूल करून घेतलेले आहे, हकीकत हि कंपनीचे संचालक यांनी पोलीस स्टेशनला येवून वरिष्ठ
पोलीस निरीक्षक, कोरेगाव पार्क पो.स्टे. पुणे शहर कडील श्री. मदन बहाद्दयपुरे यांना सांगितल्याने, त्यांनी तात्काळ तक्रारीची दखल घेतली व माथाडीचे नावाखाली खंडणी मागणारे इसम नामे बाबू ननावरे, गोविंद गायकवाड, गॅतम जगदाळे यांचेविरूद्ध खंडणी मागितली व जीवे
मारण्याची धमकी दिलेबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व एका
आरोपीस अटक करण्यात आलेली असून त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आलेली आहे.कारवाई ही मा. श्री.बच्चन सिंग सो., पोलीस उप आयुक्त, परि.२, पुणे शहर,मा. डॉप्रीती टिपरे, सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री.मदन
बहाद्दरपुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगाव पार्क पो.स्टे.पुणे, पोलीस उप निरीक्षक भागवत शेंडगे व पो.स्टे.कडील स्टाफ यांनी आरोपीस पकडून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील
तपास श्री. गणेश माने, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) कोरेगाव पार्क पो.स्टे. पुणे शहर हे करीत आहेत.