पिंपरी-चिंचवड दि,०३ :- पुणे सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ वाहनांची अज्ञात टोळक्याने तोडफोड केली होती.व या प्रकरणी काही वेळेत सांगवी पोलिसांनी एका आरोपीला अटक केलं आहे. दारूच्या नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचं सांगितलं असून आरोपी गणेश खरात याला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा आरोपी.आकाश धुडातमल आणि तिसरा आरोपी योगेश हे फरार आहेत. त्यांचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री सांगवी पोलीस ठाण्याच्या समोरच दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तिघांच्या टोळक्याने धुडगूस घालत आठ वाहनांची तोडफोड केली. यात टेम्पो आणि इतर वाहनांचा समावेश होता. आरोपी गणेश खरात, व आकाश आणि योगेश हे तिघे रात्री दारूच्या नशेत होते. त्यांनी सांगवी पोलीस ठाण्याच्या समोरच पार्क केलेल्या वाहनांना लक्ष करत सिमेंट ब्लॉक ने आणि दगडाने काचा फोडल्या आहेत. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्या आधारे पोलिसांनी आरोपी गणेश ला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत