पुणे दि,२९ :- पुणे शहरातील कोंढवा बुद्रुक , सोमजी पेट्रोल पंप जवळ कोंढवा पुणे या बिल्डिंग च्या इमारतिच्या कंपाउंड ची भिंत शेजारी असलेल्या लेबर कॅम्प च्या तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर (कांचन कम्फर्ट बिल्डिंग च्या बिल्डर ने लेबर camp बांधले आहे भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला आहे.ही धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री १.४० सुमारास घडली. बांधकाम मजुरासाठी तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या पञ्यांच्या शेडवर ही भिंत कोसळली ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आलं आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचे पथक आणि एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.
मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असून आणखी काही लोकही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. मृतांमध्ये एका दोन वर्षांच्या मुलीचा आणि एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. तीन जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.
‘पोलिस या घटनेचा तपास करीत असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल तसेच हे बांधकाम नेमकं कोणत्या बिल्डरकडून करण्यात येत होतं या बांधकामासंदर्भात आवश्यक त्या परवानग्या घेतल्या होत्या का तसेच सुरक्षा उपाययोजना करण्यात आले होते का हे तपासण्यात येईल ‘अशी माहीती पुणे पोलीस आयुक्त वेकेटेशम यांनी दिली.
मृतांची नावं
1)आलोक शर्मा -28 वर्षे
2)मोहन शर्मा -20 वर्षे
3)अजय शर्मा -19
4)अभंग शर्मा -19
5)रवि शर्मा -19
6)लक्ष्मीकांत सहानी -33
7)अवधेत सिंह -32
8) सुनील सींग -35
9) ओवी दास -6 वर्षे (लहान मुलगा )
10)सोनाली दास -2 वर्षे (लहान मुलगी )
11) विमा दास -28
12) संगीता देवी -26
जखमी :-
1) पूजा देवी -28 वर्षे
कोंढवा दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश
मुंबई, दि.२९ : पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी मृतांना कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, बांधकाम मजूर रहात असलेल्या कच्च्या झोपडीवर रात्री दीडच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो.