आष्टी दि,१५ :- आष्टी शहरातील अंधत्वाने,अपंगत्वाने,गरीबीने त्रासलेले,वेडसरपणाने त्रासलेले व्यक्ती भीक मागून आपली नियमित भटकंती करून शिळे – पाके मागून खाणारे,रुपया दोन रुपये मागून जगणारे व्यक्ती यांना राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी त्यांच्या आज दि.15 जून 2019 रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त दिवसभरात जेथे भेटतील तेथे त्यांना अन्नदान करून वाढदिवस साजरा करणार आहेत.या दिवशी राजेंद्र लाड हे कसलाही सत्कार,शाल,श्रीफळ,हार न स्विकारता गरीबांना व अपंग बांधवांना अन्नदान करणार आहेत.
राजेंद्र लाड यांना सन 2016 साली बीड जि.प.चा व महाराष्ट्र शासनाचा जिल्हा व राज्य शिक्षक पुरस्कार एकाचवेळी मिळालेला असून आजपर्यंत त्यांनी अपंग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक उपक्रम राबवून त्यांना शासनाच्या सोयी – सवलती मिळवून देण्याचे काम केलेले आहे.ते स्वतः अपंग असतांना देखील अपंग संघटनेच्या माध्यमातून अपंगांचा जनता दरबार आयोजित करून अधिकारी व पदाधिकारी यांना उपस्थित ठेवून अनेक प्रश्न निकाली काढलेले आहेत.अपंगत्वावर मात करून सदृढ शिक्षकाला लाजवेल असेच शैक्षणिक क्षेत्रात काम केलेले आहे.शौचालय बांधा अन् पाचशे एक रुपये मिळवा हा एक अनोखा व स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम राबवून अपंगांना आर्थिक मदत केलेली आहे.आष्टी शहरातील शासकीय कार्यालयांना संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान प्रास्ताविकेच्या प्रतिमा भेट दिलेल्या आहेत.पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलमित्र म्हणून सहभागी गावांना भेटी देवून अपंग असतांनाही श्रमदान करून स्वतःच्या दुचाकीवर पाण्याविषयी घोषवाक्य लिहून प्रचार व प्रसार केलेला आहे.
सर्वधर्माची जपवणूक व्हावी या उद्देशाने रमजान या पवित्र महिन्यात दोन दिवसाचे रोजाचे उपवास करून अपंगांना चांगले दिवस यावेत यासाठी दुवा मागितलेली आहे.तसेच अपंग मतदारांच्या जनजागृतीसाठी निवडणूक आयोगाचे बीड जिल्हास्तरावरील राजदूत म्हणून काम करून स्वावलंबी मतदान केंद्र स्थापन करून एक आगळा – वेगळा उपक्रम राबविलेला आहे.अशा या शैक्षणिक,सामाजिक व राष्ट्रीय कार्यात स्वतःला वाहून घेणाऱ्या आदर्श शिक्षक राजेंद्र लाड
बाळू राऊत प्रतिनिधी