पुणे दि,१४ :- पुण्यातील नागरिकांमध्ये वाहतूकीचे नियम व इतर नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे पाेलीस आता पुणेरी पाट्यांचा उपयाेग करणार आहेत. त्यासाठी विविध सूचनांच्या पुणेरी पाट्या तयार करुन घेण्यात आल्या असून सध्या त्या पाेलीस आयुक्तालयात लावण्यात येणार आहेत. या पाट्यांचे उद्घाटन पुण्याचे पाेलीस आयुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते दि,१४ रोजी करण्यात आले. भारतीय कला प्रसारणीच्या मदतीने या पाट्या तयार करण्यात आल्या आहेत. याबाबत बाेलताना पुण्याचे पाेलीस आयुक्त डाॅ. के. व्यंकटेशम म्हणाले. साेशल मीडियाच्या आधीपासून पुण्यात पुणेरी पाट्यांची संस्कृती आहे. त्यामुळे पुणेकरांना नियमांचं महत्त्व पटवून देण्यासाठी या संस्कृतीचा आधार घ्यावा असे वाटले. ही कल्पना मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर अवघ्या चार ते पाच दिवसांमध्ये त्यांनी या पाट्या तयार केल्या. याला आमच्या अधिकाऱ्यांबराेबरच नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुरुष आणि स्त्री असा काेणताही भेदभाव नसलेला सेल म्हणजे भराेसा सेल. जेव्हा 100 टक्के गरज असेल तेव्हा 100 नंबरचा वापर करा.