मुंबई दि, ०९ : – गेल्या काही वर्षांत जगभरातली भारी ठिकाणं आकाशातून आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचे नक्कीच आभार मानायला हवेत. भारतातही मुंबई असो वा पुणे किंवा अगदी केरळचा पूर, ड्रोनच्या सहाय्याने केवळ फोटोग्राफीच नाही तर आकाशातून मानवरहित सर्वेक्षण करणं, दुर्गम ठिकाणांवर नजर ठेवणं आणि संवेदनशील जागांवर गपचुप निगराणी करणं शक्य झालं आहे.
गेल्या काही वर्षांत जगभरातली भारी ठिकाणं आकाशातून आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचे नक्कीच आभार मानायला हवेत. भारतातही मुंबई असो वा पुणे किंवा अगदी केरळचा पूर, ड्रोनच्या सहाय्याने केवळ फोटोग्राफीच नाही तर आकाशातून मानवरहित सर्वेक्षण करणं, दुर्गम ठिकाणांवर नजर ठेवणं आणि संवेदनशील जागांवर गपचुप निगराणी करणं शक्य झालं आहे.
काही पाश्चात्त्य देशांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविली जात आहे, ती म्हणजे ड्रोनद्वारे डिलिव्हरी. म्हणजे तुम्ही ऑनलाईन मागवलेली एखादी छोटी वस्तू, जसं की फोन, पुस्तक किंवा एखादा पिझ्झा ड्रोनने तुमच्या खिडकीवर डिलिव्हर केला जातो.
उंच इमारतींमध्ये अशी डिलिव्हरी कंपन्यांसाठी सोयीस्कर आणि ग्राहकांना आश्चर्यचकित तसंच अधिकाधिक आकर्षित करण्याचं एक माध्यम बनू पाहत आहे. पण आता भारतातही हे शक्य होईल का आता ते पाहणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.
ग्राहकांसाठी आकर्षक योजना राबविण्यात अमेझॉन अग्रेसर असते आता ड्रोन सध्या विदेशात त्याची चाचणी केली गेली आहे
अमेझॉनचे कार्यकारी अधिकारी जेफ विलके यांच्या मते ड्रोन १५ माईल २.५ किंवा थोडे कमी किलो वजन घेऊन जाऊ शकतो
अमेरिकेत त्यासाठी त्यांना ड्रोन उडण्याचे अधिकार त्यांना मिळाले आहेत.
बाळू राऊत मुंबई प्रतिनिधी