.मुंबई ७ :-मुंबईची लाईफ समजल्या जाणाऱ्या रेल्वे मधून लाखो लोक रोज प्रवास करत असतात त्यात महिला सुध्दा असतात त्यामुळे सार्वजनीक ठिकाणी गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिला संकोच करतात त्यामुळे
गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातेला प्रत्येक लोकलच्या डब्यात दोन जागा राखीव ठेवण्याची मागणी महाराष्ट्र महिला आयोग यांच्याकडून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे करण्यात आली आहे. लोकलमधून महिलांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यात गर्भवती आणि स्तनपान करणाºया महिलांना प्रवास करणे कठीण होते. त्यामुळे अशा महिलांना प्रत्येक सामान्य डब्यांमध्ये दोन जागा राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. सकाळ आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. यातून प्रवास करणे गैरसोयीचे असते. गर्भवती आणि स्तनपान करणाºया महिलांना आपला प्रवास सुरक्षित आणि सुलभ होण्यासाठी दोन जागा राखीव ठेवण्यात याव्यात, अशी मागणी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्रव्यवहार करून करण्यात आली आहे.
महिला आणि स्तनपान करणार्या महिलांना प्रवास करणे कठीण होते. अशातच स्तनपान करणार्या महिलेला बाळाला दूध पाजण्यासाठी लोकल प्रवासात जागा अनेक वेळा मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्र महिला आयोग यांच्याकडून प्रत्येक सामान्य डब्यात दोन जागा राखीव ठेवण्याची मागणी केली आहे.