पुणे, दि, २१: – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी काल भारतीय अन्न महामंडळाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या मतमोजणी केंद्राची तसेच मिडीया सेंटरची भेट देऊन पहाणी केली. यावेळी त्यांच्या समवेत उपायुक्त प्रताप जाधव, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही मतमोजणी केंद्रातील आणि मिडीया सेंटर मधील सुविधांचा आढावा घेतला. यावेळी पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, दत्तात्रय कवितके, संजय देशमुख, पल्लवी घाटगे, विकास भालेराव तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या परिसरात होणार आहे.
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी या नंतर श्री. शिवछत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी येथील मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्राची पाहणी केली. तसेच मिडिया सेंटर व परिसरातील वेगवेगळया कक्षांना भेट देवून आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे, उपजिल्हाधिकारी संदीप निचित उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह व इतर अधिकारी उपस्थित होते.