पुणे दि,११:–चांगल्या कंपनीत नोकरीला. व पगारही चांगला.पण आई वडीलांची सेवा करणारी, आणि त्यासाठी साथ देणारी मुलगी लग्नासाठी मिळत नसल्याने पुण्यातील एका तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी तरुणाचे मन वळविण्यासाठी पुणे पोलीस आय़ुक्तांकडे हे पत्र पाठवून दिले. त्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी त्याचे समुपदेशन मन वळविण्यात यश आले.
तो एका चांगल्या कंपनीत नोकरीला. पगारही चांगला. आई वडील वृध्द, ८५ वर्षांचे आई वडील अंथरुणाला खिळलेले. तो सिंहगड रोड परिसरात राहतो. आई वडीलांना पार्किनसन्स आजार. त्याला नोकरी चांगली, पगारही चांगला. आई वडीलांची देखभाल त्याला एकट्यालाच करावी लागते. तेही ऑफिसचं काम सांभाळून. घरातील या जबाबदाऱ्यांमध्ये हातभार लावणारी, आई वडीलांची सेवा करणारी मुलगी मिळावी, त्यांची देखभाल करणारी मुलगी मिळावी अशी त्याची इच्छा. लग्नासाठी स्थळंही आली. मात्र त्यांनी त्याच्या आई वडीलांसोबत राहण्यास नकार दिला. आई वडीलांना सोडून जाता येत नाही म्हणून इतर राज्यातील नोकऱ्यांकडेही पाठ फिरवली. त्यानंतर आलेल्या नैऱाश्यातून त्याने आत्महत्येचा विचार केला. मात्र आत्महत्या करणे हा गुन्हा आहे हे समजल्यानंतर त्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सन्मानाने मरण्याची इच्छा व्यक्त करत परवानगी मागितली.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या पत्राची दखल घेत ते पत्र पुण्याच्या पोलीस आय़ुक्तांना पाठवून दिले. पोलीस आयुक्तांनी तो राहात असलेल्या परिसरातील पोलीस ठाणे दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारी यांच्यावर समुपदेशन करण्याची जबाबदारी सोपवली. दत्तवाडी पोलिसांनी त्याची वेळोवेळी भेट घेऊन त्याचं समुपदेशन केल. आणि त्यानंतर त्याचं मनोबल उंचावत त्याला आत्महत्येपासून परावृत्त केलं आहे.