पुणे दि,१० :–तक्रारदार हा अनाधिकृत सिगारेट बॉक्सेस विकत घेतल्या चा संशय व्यक्त करून त्याचे वर या संबंधाने कारवाईची भिती घालुन कारवाईन न करण्यासाठी पान टपरी चालकाकडे ५० हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून २० हजार रूपयाची लाच खासगी इसमामार्फत स्विकारणारा पोलिस कर्मचारी आणि खासगी इसम अॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकले आहेत. त्या दोघांना अॅन्टी करप्शनच्या पथकाने लाच घेतल्यानंतर रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस नाईक संजय भिला वाघ (३८, बक्कल नंबर ३७३८, नेमणुक चर्तुःश्रृंगी पोलिस स्टेशन) आणि किरण प्रकाश पाले (रा. जुनी सांगवी, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराची परिसरात पानाची टपरी आहे. पान टपरीवर अनाधिकृत सिगारेटची विक्री करतो म्हणुन पोलिस कर्मचारी वाघ हे तक्रारदारास कारवाईची भाषा करीत होते. कारवाई न करण्यासाठी त्यांनी ५० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. दरम्यान, तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार नोंदविली. दि. १० मे रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पोलिस नाईक संजय वाघ हे लाचेची मागणी करीत असल्याचे निष्पन्न झाले.
अॅन्टी करप्शनच्या पथकाने आज (शुक्रवार) पुणे-मुंबई हायवे वरील हॉटेल यशोदासमोर सापळा रचला. सरकारी पंचासमक्ष खासगी व्यक्ती किरण पाले याच्यामार्फत पोलिस नाईक संजय वाघ यांनी तक्रारदाराकडून २० हजार रूपयाची लाच घेतली. त्यानंतर अॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर अधीक्षक दिलीप बोरस्ते, उपाधिक्षक सुहास नाडगौडाराजु चव्हाण पोनी , एसीबी पुणे, पोनि सुरेखा घार्गे, एसीबी पुणे, पोहवा सुनिल शेळके , पोना श्रीकृष्ण कुंभार पोला विनोद झगडे ASI जाधव,
यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.