पुणे दि,०८ : – मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग उद्या दि.९ दुपारी १२ ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यात बंद करण्यात येणार असल्याची माहिती राज्य वाहतूक विभागामार्फत देण्यात आली आहे. २ तासासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बंद राहणार आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कि.मी. ५५/६०० आणि ८८/०० मुंबई वाहिनी ओव्हरहेड गॅन्ट्री (Overhead Gantry) बसवण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (MSRDC) यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. सदर कालावधीत द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तासा करिता पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यादरम्यान सर्व प्रकारची अवजड व मालवाहतुक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील कि.मी. ८५/५०० या ठिकाणी थांबविण्यात येणार आहे. हलकी चारचाकी व इतर प्रवाशी वाहने ही द्रुतगती मार्गावरील किवळे ब्रिज येथून जुना मुंबई-पुणे महामार्ग (NH-4) ने मुंबईकडे वळविण्यात येणार आहे. वाहन चालकांनी याची नोंद घेवुन महामार्ग पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे विभागाचे पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी केले आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग पत्रकार
सचिन राम काळे, संकेत संतोष काळे