पुणे दि,०७ :–तक्रारदार हे मत्स्य व्यवसाईक संस्थेचे सचिव असुन , हडपसर येथील मत्स्य व्यवसाय केंद्राच्या मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्याला १५ हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
जनक मल्हारी भोसले (वय ५४, रा. कुबेरा संकूल, हडपसर) असे पकडण्यात आलेल्या मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तक्रारदार हे मत्स्य व्यावसायिक संस्थेचे सचिव आहेत. त्यांच्या संस्थेला यापुर्वी भोसले यांच्या मार्फत एक तलाव मंजूर केला होता. मंजूर झालेल्या तलावाच्या ठेक्याचा मोबदला म्हणून भोसले याने त्यांच्याकडे २० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार यांनी याची तक्रार अँटी करप्शनकडे केली. त्यावेळी पथकाने याची पडताळणी केली तेव्हा भोसले यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. अँटी करप्शनच्या पथकाने भोसले याला तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्विकारताना मत्स्य व्यवसाय केंद्र हडपसर येथे रंगेहात पकडले.
सापळा पथक , सुहास नाडगौडा पोउपअधि, एसीबी पुणे, पोनि सुरेखा घार्गे, एसीबी पुणे, पोना विनोद झगडे , पोना गिरीगोसावी, पोक अंकुश आंबेकर,मपोशि शुभांगी पाटील, पोशि अविनाश इंगुळकर, पोहवा कर ही करावाई पोलीस अधिक्षक संदिप दिवाण, अप्पर पोलीस अधिक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे अँटी करप्शनच्या पथकाने केली.
एखाद्या लोकसेवकाने लाच मागितल्यास त्यासंदर्भात अँटी करप्शनच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी केले आहे.