पुणे दि,०१ : – मोबाईल चोरी प्रकरणी कारवाई न करण्याकरिता ५ हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून २ हजार रूपयाची लाच घेणार्या पोलिस हवालदाराला अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. करीम मोहम्मद शरीफ शेख (४७, पोलिस हवालदार बक्कल नंबर ५३०९, येरवडा पोलिस स्टेशन) असे लाच घेणार्याचे नाव आहे. याप्रकरणी २४ वर्षीय युवकाने अॅन्टी करप्शनकडे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करूनच ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदारावर मोबाईल चोरी प्रकरणी कारवाई न करण्यासाठी पोलिस हवालदार करीम शेख यांनी त्यांच्याकडे ५ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. २ हजार रूपयांवर तडजोड झाली. अॅन्टी करप्शनच्या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा सापळा रचला. त्यावेळी पोलिस हवालदार करीम शेख यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून २ हजार रूपयाची लाच स्विकारली. त्यानंतर पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर अधीक्षक दिलीप बोरस्ते, उपाधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपाधीक्षक प्रतिभा शेंडगे, पोलिस निरीक्षक राजू चव्हाण, पोलिस हवालदार शेळके आणि पोलिस कर्मचारी अभिजीत कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.