पुणे,दि.08 :- सायं दैनिक शक्ती झुंजार चा 25 वा वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रम व वधु वर पालक परिचय मेळावा या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील वधु वर पालक व वधू वर यांच्यासह मान्यवरांनी भरभरून कौतुक केले
तसेच मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी कार्यक्रमाच्या भाषणात आलेल्या वधू-वर पालकांना आपण संपूर्ण महाराष्ट्रातून संतोष काळे च्या आग्रहाला मान देऊन आपण सर्व तेली समाजातील पालक इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे इथे मनःपूर्वक स्वागत करतो व वधु वर परिचय मेळावा या कार्यक्रमाला तुम्ही मला प्रमुख पाहुणे व सहकारी म्हणून मला बोलवलं याबद्दल मी मा. संतोषी काळे व त्यांचे चिरंजीव संकेत काळे व अनिकेत काळे या तिघांचे व झुंजार टीमचे प्रतिनिधी व पत्रकार बांधव यांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो
निम्हण यांनी त्यांच्या भाषणात समाज व राज्यकर्ते यांना याेग्य दिशा दर्शवण्याचे काम झुंजार हे माध्यमे प्रमानिक पण करत आहेत.यापुढेही अशाच पध्दतीचे काम झुंजार च्या माध्यमांनी करावे
व झुंजार ग्रुप च्या वर्धापन दिनानिमित्त.गेल्या 6 वर्षापासून सामाजिक उपक्रम वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजन करीत आहे असे, प्रतिपादन पुण्यातील मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सायं दैनिक शक्ती झुंजारच्या 25 व्या वर्धापन दिनानिमि पुण्यातील औंध येथील पंडित भीमसेन
जाेशी कलादालनात आयाेजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बाेलत हाेते.व निम्हण यांनी त्यांच्या भाषणामध्ये
सायं दैनिक शक्ति झुंजार चा 1999 पासून सुरू
झालेल्या शून्यातून प्रवास व सायं दैनिक शक्ती झुंजार,व
झुंजार,व, झुंजार नामा चे निर्भिड बातमी व अन्यायाविरुद्ध व निपक्ष लिखाणावर संपादक व पत्रकार व संपूर्ण टीमचे काैतुक केले,संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश भाेज, तेली व पुण्यातील कायद्याचा कार्यक्रमासाठी आलेले तेली समाजाचे माजी अध्यक्ष व कार्यकर्ते व नितीन खाेड,सांज दैनिक शक्ती झुंजारचे संपादक संताेष काळे यांच्यासह यादी मान्यवर उपस्थित हाेते.
मान्यवरांच्या हस्ते दैनिक सांज शक्ती झुंजारच्या कलर अंकांचे तसेच वधुवर पालक परिचय माहिती पुस्तिकाचे प्रकाशन करण्यात आले.
मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण……………………
म्हणाले;’ लाेकशाहीचा चाैथा
आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते. अन्याय विरुद्ध
आवाज उठवत समस्यांचे निराकरण करणे समस्याला वाचा फाेडणे हे प्रसार माध्यमांचा काम आहे समाजातील आपली विश्वासहार्ता निर्माण करत सातत्याने चांगली आणि सकारात्मक दृष्टिकाेनातून पत्रकारिता माध्यमातून पत्रकारांनी काम करणे गरजेचे आहे अशी भावना निम्हण यांनी व्यक्त केली.
तसेच पुण्यातील श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूडचे अध्यक्ष यांनी त्यांच्या भाषणात
शिक्षण शाप की वरदान ?….
भाषणात समाज बांधवांची जनजागृती केली व सांज दैनिक शक्तीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त तेली समाजाचा पुण्यात 6 ऑक्टोंबर रोजी वधु वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन पंडित भीमसेन जोशी कलादालन औंध पुणे येथे पार पडला संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक वधू-वरांनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती कार्यक्रमा त पाहुणे म्हणून श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूडचे अध्यक्ष श्री रमेश भोज होते या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सांज दैनिक शक्तीचे श्री संतोष काळे यांनी केले
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नितीन खोंड व इतर तेली समाजातील उपस्थित आजी-माजी अध्यक्ष व मान्यवर
यांनी अधिक परिश्रम घेतले सध्या समाजात मुलींच्या उच्च शिक्षणामुळे त्यांच्या बरेच अपेक्षा वाढल्या असल्यामुळे विवाहास विलंब होत असून घटस्फोटाचे प्रमाणही वाढलेले आहे हे नियंत्रणात आणणे फार गरजेचे आहेत्यामुळे शिक्षण शाप की वरदान असे म्हणण्याची वेळ आलेली आहे त्यात मुला मुलींनी अपेक्षाच ओझं थोडं कमी करून आपला योग्य जोडीदार निवडावा आणि वेळेतच विवाहबद्ध व्हावं
असे उदगार रमेश भोज यांनी आपल्या भाषणात काढले राष्ट्रपतीपदक विजेते श्री दिलीप फलटणकर यांनी लग्न उशिरा होण्याची अनेक कारणे दिले संताजी प्रतिष्ठान कोथरूड चे उपाध्यक्ष श्री चंद्रकांत जगनाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केलेयाप्रसंगी मधुकर गुलवाडे कमलाकर करपे व
अनेक पालकांनीही आपल्या मुलांच्या लग्न न जमण्याच्या व्यथा कथन केल्या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दिलीप फलटणकर यांनी केले तर आभार नितीन खोंड यांनी मांडले सुरुची स्नेहाभोजनाने आलेल्या पाहुण्यांची कार्यक्रमाची सांगता झाली