पुणे,दि.१५:- पुणे शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर बीम लाईट, प्रखर बीम लाइटवर बंदी घालण्याचे आदेश सहपोलिस आयुक्तांनी यांनी दिली आहे
गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर, प्रखर बीम लाईट लावल्यास कारवाई होणार असल्याने मंडळांनी पोलिसांच्या आदेशाची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाढ यांनी दिली आहे.
पुणे पोलिसांनी लेझर बीम लाइट वापरण्यात बंदी घातली आहे. तसे आदेश पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी काढले होते. तसेच कारवाईचा इशारादेखील दिला ्
डोळ्यांना त्रास देणार्या या लेझर लाइटमुळे गेल्या वर्षीदेखील पुणेकरांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. तसेच, गणेशोत्सवात यामुळे अनेकांना त्रासदेखील झाला होता. बंदीचे आदेश असताना देखील दहीहंडीत पोलिसांचे आदेश धुडकावून सर्रास लेझर, बीम लाइटचा वापर केल्याचे पाहायला मिळाल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर, बीम लाइटचा वापर झाल्यास पोलिसांकडून कारवाईचे संकेत मिळत असल्याने मंडळांनी याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.