पुणे,दि.१६:- राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांना विशेष मोहिम पदक जाहीर करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या वतीने स्वतंत्र दिनाच्या पुर्वसंधेला या पदकाची घोषणा करण्यात आली आहे. मद्य तस्करी, गावठी दारू वर धडक कारवाई करून. रजपूत यांनी दोन वर्षात आठ हजार पेक्षा अधिक कारवाई केल्या आहेत. राजपूत यांच्या उल्लेखनिय कामगिरीची दखल घेत त्यांना पदक जाहीर करण्यात आले आहे. पदक, सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी आणि कर्चमाऱ्यांचे मंत्री शंभूराज देसाई, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे.
उत्पादन शुल्क विभागात उल्लेखनिय आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने विशेष पुरस्कार देण्याची योजना प्रथम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेतील सन 2023- 24 मधील अधिकारी आणि कर्मचारी यांना उत्कृष्ट तथा गुणवत्ता पूर्ण कार्याबद्दल विविध पदके, सन्मानचिन्हे जाहीर करण्यात आली आहे. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये राज्य स्तरावरून तीन पुरस्कार जाहीर करण्यात आली आहेत. .