पुणे ग्रामीण,दि.१३:- पुण्यातील पुणे ग्रामीण परिसरातील कामशेत येथील दोन
ऑर्केस्ट्रा बार च्या नावाखाली मध्यरात्रीनंतरही चालू असणाऱ्या काही वर्षापासून छम छम बारच्या मुलींवर लाखोंची उधळण व ऑर्केस्ट्राच्या दोन वर मध्य डान्स करणारे नर्तकीवर लाखो रुपयाची उधळण होणाऱ्या ऑर्केस्ट्रा बार वर पुणे ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करून
बार चालू ठेवणाऱ्या मावळ तालुक्यातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई करण्यात आली. कामशेत येथील दीपा बार अँड रेस्टॉरंट व वडगाव मावळमधील फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट अशी बारची नावे आहेत. लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने शनिवारी (ता. १०) मध्यरात्री ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणावळा उपविभागाचे सहा पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट ई.यांचेकरिता प्रशासनाने वेळेचे बंधन घालुन दिलेले असतानाही काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असल्याबाबतची माहिती कार्तिक यांना प्राप्त झाली होती.
त्याची खातरजमा करण्यासाठी सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकासह मध्यरात्री पथकासह कामशेत येथील दीपा बार अँड रेस्टॉरंट व वडगाव मावळमधील फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट अशा दोन्ही ठिकाणी छापा टाकला. यावेळी बार रेस्टॉरंट चालक हे विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी त्यांच्या ग्राहकांना खाद्यपदार्थ, मद्याची विक्री करताना आढळून आले. दोन्ही बार मालकांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियमचे कलम ३३ (डब्ल्यू), १३१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना चालकांवर कठोर कायदेशीर कारवाईची मालिका यापुढेदेखील सुरुच राहणार असून, आस्थापना चालकांनी त्यांना घालून दिलेल्या नियमांचे व वेळेच्या बंधनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली