पुणे,दि.२५ : – पुणे शहर पोलीस सह
आयुक्त प्रवीण पवार यांची गृहमंत्रालयाने आज मंगळवारी दि.25 जून बदली करण्यात आली आहे. प्रवीण पवार यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने काढले आहेत.
कोकण परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांची पुणे शहर पोलीस सह आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.