पुणे,दि.२१ :- पुणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत स्टॉल, पथारी, हातगाडी विक्रेत्यांवर कारवाई पुणे महानगरपालिका सहायक आयुक्त औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालय यांचे नियंत्रणात औंध, बोपोडी परिसरातील अतिक्रमण विभाग व बांधकाम विभाग यांच्या संयुक्त कारवाई करण्यात आली. परिसरातील अनधिकृत बांधकाम व खाद्यपदार्थ विक्रेते, गॅस सिलेंडर वापरणारे व्यावसायिक यांच्यावर कारवाई करण्यात आली. एकूण ५६ विक्रेत्यांवर यावेळी कारवाई केली.या कारवाईत स्टॉल ०१,हातगाडी – १५ काउंटर – १४
सिलेंडर – ०२ इतर – ०९ शेड/झोपड्या – १५ अशा एकूण ५६ जणांवर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग उपायुक्त माधव जगताप यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.पालिकेने दिलेले परवाने, फेरीवाला प्रमाणपत्र अटी, शर्तीचा भंग करणे, पोटभाडेकरू ठेवणे, मान्य जागेवर / मान्य व्यवसाय न करणे, गॅस सिलेंडरचा वापर अशा विक्रेत्यांवर यावेळी कारवाई करण्यात आली. अनधिकृत व्यवसाय करणा-या व्यवसायिकांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले जाणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
सदर कारवाई उप आयुक्त अतिक्रमण विभाग माधव जगताप,व कारवाईत विभागीय शाम अवघडे विभागीय अतिक्रमण अधिकारी. सुभाष तळेकर क्षेत्रिय अतिक्रमण निरिक्षक. सचिन उतले ,अतिक्रमणं निरिक्षक.केंद्रे पोलीस निरीक्षक चतुःश्रृंगी . पठाण, पोलीस निरीक्षक वाहतूक व परिमंडळ क्रमांक ०१ ते ०४ कडील संपूर्ण अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, पोलीस निरीक्षक ०१ व पोलीस कर्मचारी ०९ महाराष्ट्र सुरक्षा दल पथक, कायम बिगारी भयम, ठेकेदार बिगारी संवक, स्थानिक वाहतूक विभागाकडील कर्मचारी तसेच बांधकाम विकास विभाग यांच्या सहाय्याने संयात कारवाई करिता जे.सी.बी., गॅस कटर, ब्रेकर, विद्युत विभागाकडील स्टाफ अशा सर्व यंत्रणेसह विशेष कारवाई मोहीम राविण्यात आली.