पुणे,दि.०३:- वाहतुकीचे नियम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियम न पाळता वाहने चालवताना अडवल्यास वाहतूक पोलिसांशी वाद न घालता वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन वाहतूक पोलीस. व लायन्स क्लब
यांनी केले.
१ मे, महाराष्ट्र दिनाचे’
औचित्य साधत लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ D2 यांनी ‘रस्ता सुरक्षा अभियान ‘ Celebrity Campaign ‘ सह ब्रेमेन चौक औंध, पुणे येथे ट्राफिक ऑफिसर, औंध, अंकुर रुग्णालय, औंध व ह्याटेल भैरवी, औंध यांच्या सहकार्याने केले.
सिने अभिनेत्री क्रृतिका तुळसकर ( रात्रीस खेळ चाले – शेवंता ) यांनी नियम पाळणारास गुलाबाचे फुल दिले तर नियम न पाळणारास ट्राफिक पोलीसांनी यांनी कोपरखळी वाले स्टीकर्स संबंधितांच्या वाहनास चिकटवले.
आपत्कालीन वाहनास ( रूग्णवाहिका ) गर्दीतून रस्ता कसा देण्यात यावा यांचेही प्रात्यक्षिक त्यावेळी दाखविण्यात आले.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत, औंध परिसरात आयोजित ट्राफिक पोलीसांनी आवाहन केले. सध्या चुकीच्या बाजूने गाडी चालवणे, हेल्मेट न वापरता दुचाकी चालवणे, फोन कानाला लावून संवाद साधत गाडी चालवणे, मद्यपान करुन वाहन चालवणे या प्रमुख चार कारणांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अपघात टाळावे व नियम पाळावे यासाठी, वाहतूक विभागाच्या वतीने दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान देशभर राबवले जात असल्याचे एस. एस. पठाण यांनी सांगितले.
अनेक वाहन चालक वाहने चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत. त्यात कर्तव्यावर असताना वाहतूक पोलिसांनी अशी वाहने अडवल्यास वाहन चालक या ना त्या कारणांवरून वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालतात. परंतु हे नियम तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी आहेत. त्यामुळे नियमांचे पालन करणे आवश्यकच असल्याचे एस. एस. पठाण म्हणाले.
या कार्यक्रमात साधत लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ D2 ट्राफिक ऑफिसर, औंध, अंकुर रुग्णालय, औंध व ह्याटेल भैरवी, औंध यांच्या सहकार्याने केले.
सिने अभिनेत्री क्रृतिका तुळसकर ( रात्रीस खेळ चाले – शेवंता ) यांनी नियम पाळणारास गुलाबाचे फुल दिले तर नियम न पाळणारास वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी, यांनी कोपरखळी वाले स्टीकर्स संबंधितांच्या वाहनास चिकटवले.
आले. यावेळी लायन DC मंदाकिनी माळवदे ( संयोजक ), लायन डॉ. राजन कामत ( स्पान्सरर), लायन नितीन खोंड, ट्राफिक अधिकारी. एस. एस. पठाण व सहकारी, पोलिस अधिकारी. नांदे व सहकारी, डॉ. चिन्मय जोशी,संचालक, अंकुर रूग्णालय, औंध,व त्यांचे सहकारी, राहूल मुरकुटे व सहकारी, संजय कामत, सौ. चित्रा कामत, सौ. माधवी खळदकर, श्रीमती मानसी गोडबोले, अभिनेते अतुल मोरे, प्रतिक पाटील, राकेश सावंत, चंद्रशेखर पाटील व अनंत पाटील हे हजर होते.