पुणे,दि.२४:- पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक विभागाने गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन
व गावठी हातभट्टी दारूचा व (जमीनीखाली असलेल्या टाक्यामधील) साठा उधवस्त करून
जवळपास 1कोटी 69 लाख 5 हजार रुपये किंमतीचे रसायन पोलिसांनी जप्त केले असून आरोपीविरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन
व गावठी हातभट्टी दारूचा व (जमीनीखाली असलेल्यासाठा असलेची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस अंमलदार भिवरकर व जमदाडे यांना खात्रीशीर बातमी मिळाली.
व त्या ठिकाणी छापा टाकून आरोपींना पकडण्यात आले असुन मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
3 आरोपी विरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम गुरनं ४००/२०२४ भादवि कलम ३२८, ३४, महाराष्ट्र प्रोव्हिबीशन कायदा कलम ६५ (ख) (च) (ड) अन्वये तीन व्यक्ती विरूध्द गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेत गट क्र.४२१, वडगाव शिंदे, ता. हवेली. जि. पुणे येथे आरोपीने एकुण सात ठिकाणाहुन (जमिनी खालच्या टाक्या) २,१०,००० लिटर हातभट्टी दारू तयार करणेसाठी लागणारे रसायन त्याची किंमत १,०५,००,०००/-व तयार हातभट्टी दारू १५०० लिटर त्याची अंदाजे किं १,८०,०००/- व हातभट्टी गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य १५०००/- रू असा एकुण कि.अं. १,०६,९५०००/- रू. मोठा मातीत खोदलेला खड्डा व त्यावर नायलॅानची ताडपत्रीवरील गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन असे जवळपास 1 कोटी 6 लाख 95 हजार रुपये किंमतीचा माल बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरला आहे. घटनास्थळी पोलिसांना रसायन व भट्टी तयार करून ठेवलेली मिळाली आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, सपोनि राजेश माळेगावे सहा. पोलीस फौजदार राजेंद्र कुमावत, पोलीस अंमलदार बाबा कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, मनिषा पुकाळे, हणमंत कांबळे, ओंकार कुंभार, इरफान पठान, इम्रान नदाफ, अमेय रसाळ, सागर केकाण, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ, अविनाश कोंडे या पथकाने यशस्वी केली आहे.