अयोध्या,दि.१७ :- रामनवमीनिमित्त आज अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उद्घाटनानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. यानिमित्ताने याठिकाणी सूर्य-तिलक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
आज दुपारी १२ वाजता सूर्याच्या किरणांनी रामलल्लांना तिलक लावला. सुमारे 4 मिनिटे सूर्याची किरणं मूर्तीच्या डोक्यावर पडत होती. अशा प्रकारे रामलल्लांचा सूर्याभिषेक सोहळा पार पडला.
व्हिडिओ पाहण्यासाठी फोटोला क्लिक करा
पौराणिक कथांंनुसार, जेव्हा प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता; तेव्हा सूर्यदेवाने येऊन त्यांना आशीर्वाद दिला होता. याच प्रसंगाची पुनरावृत्ती करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिरात विशेष तयारी करण्यात आली होती. आज दुपारी 12 वाजता, एका खास तंत्राच्या मदतीने सूर्याची किरणे रामलल्लांच्या मूर्तीवर प्रक्षेपित करण्यात आली. रामलल्लांच्या कपाळावर या मदतीने सूर्यकिरणांचा तिलक लावण्यात आला.
अयोध्येतील राम मंदिर हे तीन मजली उंच आहे. यातील तळमजल्यावर असणाऱ्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान आहेत. त्यामुळे याठिकाणी सूर्य किरणे पोहोचवणं हे एक चॅलेंज होतं. यासाठी रुडकी आणि बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सच्या मदतीने नवीन तंत्रज्ञान विकसित केलं गेलं.