पिंपरी चिंचवड,दि.०१:- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत बेशिस्त कारचालक काळ्या काचा असलेल्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली. वाकड येथील फिनिक्स माॅल परिसरात व थेरगाव येथील पदमजी पेपर मिल परिसरात ही कारवाई केली. यात ४०६ वाहनांवर कारवाई करून चार लाख ३७ लाखांचा दंड वाहनावरही वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.
वाकड येथील फिनिक्स माॅल परिसरात दिवसभरात ३०५ वाहनांवर दोन लाख ५०० दंड आकारला. चारचाकी वाहनांच्या काळ्या काचांवर कारवाई करण्यात आली. पहिल्यांदा केलेल्या कारवाईत ५०० रुपये दंड आकारला. त्यानंतरही काळ्या काचा आढळून आल्यास संबंधित वाहनावर १५०० रुपये दंड आकारण्यात येतो. यानुसार पोलिसांनी कारवाई केली. पदमजी पेपर मिल समोरील रस्त्यावर बेशिस्तपणे पार्क होणाऱ्या ४७ वाहनांवर कारवाई करून ५० हजार रुपयांचा दंड आकारला.