मुंबई,दि.२१ :- लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपचे २० उमेदवारांची यादी जाहीर करून प्रचारात सुरू केलाआहे.तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीही अनौपचारिकपणे काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र महाराष्ट्र काँग्रेसने अद्याप आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीयेत. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या संपन्न झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील सात उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. या यादीत दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात महाविकास आघाडीतील जागा उद्धव ठाकरे यांनी तीन तर शरद पवार यांनी एका जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या महाराष्ट्राच्या उमेदवारांबाबत दिल्लीत बैठक झाली. यामध्ये महाराष्ट्रातील सात नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोणत्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब?
सोलापूर – प्रणिती शिंदे
गडचिरोली- नामदेव किरसांड
कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
अमरावती- बळवंत वानखेडे
नंदुरबार- गोवाल पाडवी (केसी पाडवी यांचे चिरंजीव)
पुणे – रवींद्र धंगेकर
चंद्रपूर- प्रतिभा धानोरकर/विजय वडेट्टीवार