पुणे ग्रामीण,दि १८. (झुंजार नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या इंदापूर शहरालगतचे बायपास रोडवरील जगदंबा हॉटेलमध्ये पुण्यातील एका गुन्हेगारांची पूर्ववैमनस्यातून रिव्हालवरमधून गोळ्या झाडून हत्या केली होती
दि.१६ रोजी संध्या. ०८/०० वा सु॥ स अविनाश बाळु धनवे वय ३१ वर्षे, रा. चहोली बु ।।, वडमुखवाडी, ता. हवेली जि. पुणे हा त्याचे इतर तीन मित्र नामे बंटी ऊर्फ प्रणिल मोहन काकडे, राजु एकनाथ धनवडे, राहुल एकनाथ धनवडे यांचे सोबत जेवण करण्यासाठी थांबलेला होता. जेवणाची ऑर्डर देवून चारही मित्र टेबलवर बसलेले असताना आठ जणांचे टोळीने हातात पिस्टल, कोयता घेवून येवून हॉटेल मध्ये बसलेल्या अविनाश धनवे याचेवर पिस्टल मधून फायर केला व कोयत्याने त्याचेवर वार करून त्याचा जागीच खून केला. त्यावेळी इतर सोबतचे तीन मित्र हे त्या ठिकाणाहून पळून गेले. इ गालेल्या घटनेबाबत अविनाश धनवे याची पत्नी सौ. पुजा अविनाश धनवे रा. सदर हिने इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हा केला
या घटने नंतर इंदापूर मध्ये एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या खूनाची माहिती मिळाल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली व आरोपींच्या शोधाकरीता पथके तयार करुन त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती.
दरम्यान या खूनप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी एकूण चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत १) बाबुराव भेंडेकर २) मयूर पाटोळे ३) सतिश पांडे ४) विश्वंभर भत्ते अशी त्यांची नावे आहेत.
आरोपींना कोल्हापूर हायवे रोडवरील शिंदेवाडी गावचे परिसरातून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर यापुर्वी खुन, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयातील इतर पाहिजे आरोपींचा शोध चालू आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक. पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, बारामती विभाग, अपर पोलीस अधीक्षक. रमेश चोपडे, पुणे विभाग, एस.डी.पी.ओ. भाऊसाहेब ढोले, हवेली विभाग, स्वप्निल जाधव, दाँड विभाग, सुदर्शन राठोड, बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, इंदापूर पोलीस स्टेशनचे पो.नि. सुर्यकांत कोकणे स्था.गु.शा.चे सपोनि योगेश लंगुटे, कुलदीप संकपाळ, पोसई प्रदीप चौधरी, गणेश जगदाळे, अमित सिदपाटील, पोलीस अंमलदार बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, राजु मोमीण, अतुल डेरे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, अजय घुले, प्रकाश वाघमारे, जनार्दन शेळके, तुषार पंदारे, विक्रम तापकीर, दिपक साबळे, संदीप वारे, बाळासाहेब खडके, राहुल घुबे, निलेश सुपेकर, अक्षय नवले, निलेश शिंदे, काशिनाथ राजापुरे, अक्षय सुपे, दगडू विरकर इंदापूर पो स्टे कडील सपोनि प्रकाश पवार, पोसई गरड, पोलीस अंमलदार प्रकाश माने, सचिन बोराडे, सलमान खान, नंदू जाधव, विशाल चौधर, अमित यादव, विनोद काळे, मपोहवा माधुरी लडकत यांनी केली आहे.