पुणे,दि.१७ :- पुणे शहरात अल्पवयीन मुल व गुन्हेगारांवर आळा बसावा यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली . यामध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना गुन्हेगारी टोळ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत .
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपुर्वी अल्पवयीन मुलांकडून हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार दिसून येते आहे. तसेच अनेक ठिकाणी वाहनांच्या तोडफोडीच्या प्रकरणात सुद्धा दिसून येते असल्याने पोलीस आयुक्त यांनी याबाबत आता कठोर पावले उचलली आहेत.
‘अल्पवयीन मुलांकडून जर कुठला गुन्हा घडत असेल तर त्याला प्रतिबंध करण्याचे काम त्यांच्या पालकांचे सुद्धा आहे . त्यामुळे जर अल्पवयीन मुलांकडून तोडफोडीचे गुन्हे घडले तर आता त्या मुलांच्या पालकांवर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे. तसचं पुण्यात कोयत्याने हल्ले रोखण्यासाठी शहरात कुठे कुठे कोयते विकल्या जातात यावर लक्ष देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.