पुणे,दि.१७ :- भारतात झपाट्याने झालेल्या डिजिटल क्रांतीमुळे भारतातील शहरांपासून खेड्यांपर्यंत विविध सरकारी व निम सरकारी योजना पोहोचवण्यात आल्या. त्यात यु.पी.आय आधार कार्ड मुळे पूर्ण देश व देशातील नागरिकांना एक संघ जोडण्यात यश आले. याचे सर्व श्रेय जाते ते माजी मुख्य आर्किटेक्ट आधार, युपीआय आणि इंडिया स्टॅक, सिटिओ एकस्टेप फाउंडेशनचे डॉ. प्रमोद वर्मा यांना व त्यांच्या सनबर्ड समूहाला. भारत नवीन स्केल आणि गतीसह डिजिटल पायाभूत सुविधांच्या उभारणीत धोरणात्मक बदल करत आहे. डिजिटल सार्वजनिक वस्तू (डीपीजी), डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय) नवीनता आणि सर्जनशीलतेची माहिती करून देण्यासाठी येत्या २२ व २३ मार्च रोजी पुण्यातील विमान नगर येथील सिम्बॉयसिस ईशान्य सभागृह येथे डिजिटलायझेशन वरती आंतरराष्ट्रीय परिषद भरविण्यात आली आहे.
डीपीजी टेक फ्यूजन या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन सनबर्ड समूह आणि टेकडी टेक्नॉलॉजीजने केले आहे. भारत नवीन स्केल आणि गतीसह डिजिटल पायाभूत सुविधांच्या उभारणीत धोरणात्मक बदल करत आहे हे लक्षात घेऊन नवोदित हे परिवर्तनाची प्रेरक शक्ती आहेत. त्यांनी नवोन्मेषकांना आणि स्टार्ट-अप्सना मार्केट इनोव्हेशनचा अवलंब करण्याचे आणि डिजिटल पब्लिक गुड्स (डीपीजी) – ओपन स्टँडर्ड्स आणि डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मॉडेल्स, स्टँडर्ड्स आणि कंटेंटसह ओपन सोर्स सॉफ्टवेअर – आणि त्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये प्रोटोकॉल वापरण्याचे आवाहन केले.
दोन दिवस चालणाऱ्या परिषदेमध्ये डॉ. प्रमोद वर्मा, सीईओ आयजिओटी कर्मयोगी भारतचे अभिषेक सिंह असे अनेक प्रख्यात वक्ते डीपिजीएस आणि डीपीआयएस तयार करण्यामधील त्यांचे अविश्वसनीय अंतर्दृष्टी, कौशल्य आणि यशोगाथा सांगतील. देश खरोखरच शाश्वत आर्थिक विकासाच्या शक्यतेची पुनर्कल्पना करत आहेत आणि ते कसे करता येते हे भारताने जगाला दाखवून दिले आहे,” डीपीआय क्षेत्रातील चांगल्या तंत्रज्ञान कौशल्यांसह नवोन्मेषकांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी आणि तरुणांमध्ये नवोपक्रम आणि उद्योजकतेची भावना बिंबवली पाहिजे. यासाठी तरुणांनी व तंत्रज्ञानामध्ये कार्यरत असणाऱ्या तरुणांनी या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी https://lu.ma/kinhufit वर सदस्य नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. सदरील परिषद ही पुण्यातील माहिती तंत्रज्ञानचे विद्यार्थी तसेच तंत्रज्ञान व्यावसायिक यांसाठी विनामूल्य आहे.