मुंबई दि. १७:- (अधिराज्य) प्रबोधनाच्या माध्यमातून मानवात परिवर्तन घडवून त्याला खऱ्या अर्थाने माणूस घडवणे त्याचप्रमाणे ताथगत गौतम बुद्धांनी दिलेल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे या उद्देशाने बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मा. सभापती सरसेनानी आनंदराज आंबेडकर, मा. कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, मा. सरचिटणीस राजेश घाडगे यांच्या संकल्पनेतून संस्कार समिती अध्यक्ष आदरणीय मंगेश पवार गुरुजी, सरचिटणीस मनोहर बा. मोरे गुरुजी यांच्या अधिपत्याखाली बौद्धाचार्यांच प्रशिक्षण शिबीर ११ नोव्हेंबर २०२३ ते ११ मार्च २०२४ या पाच महिन्यांच्या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिरात १३ महिला व १८ पुरुष शिबिरार्थी सहभागी झाले होते, सदर शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले, उपरोक्त शिबिराचा अनुषंगाने बौद्धाचार्य – बौद्धाचार्या परीक्षा २०२३-२४ शनिवार दि. २३ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात आली आहे, परीक्षेचे केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे असून केंद्रावर हॉलतिकीट बीपीएस २४०१ ते बीपीएस २४३१ (BPS 2401 to BPS 2431) असे असून सदर हॉलतिकीट सोबत असणे अनिवार्य आहे, हॉलतिकीट पाहूनच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल, परीक्षेचे स्वरूप लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक (Written, Oral, Practical) अश्या प्रकारे राहणार असून वरिष्ठ बौद्धाचार्य परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत याची परीक्षार्थी विद्यार्थी/ विद्यार्थींनिनी नोंद घ्यावी असे विनम्र आवाहन मा. मंगेश पवार गुरुजी यांनी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केले आहे.