पुणे,दि.१४ :- ज्यावर पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये विदर्भात मुसळधार पावसाचा शक्यता. हवामान विभागाने वर्तवला आहे.
तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. अशातच पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सध्या वायव्य राजस्थानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे उत्तरेतील राज्यात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
१६ मार्चपासून ते १८ मार्चपर्यंत विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खान्देशात देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने विदर्भाला विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
तर राज्यातील काही भागांमध्ये उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. मुंबई, पुणे सोलापूर, मालेगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअसच्या जवळ आहे.
उत्तर भारतातही पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जम्मू – काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विजांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. बंगाल आणि सिक्कीममध्ये 14 मार्चपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर, 17 मार्चपर्यंत पश्चिम बंगाल प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 14 ते 17 मार्च या कालावधीत ओडिशामध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.