पुणे,दि.३१:- वडिलोपार्जित जमिनीच्या सुनावणीचा निकाल तहसिलदार कार्यालयाने विरोधात दिल्याच्या निषेधार्थ पुण्यात एका तरुणाने संचेती रुग्णालयाच्या पुलावर आत्महत्येचा प्रयत्न केला.तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर त्याची मनधरणी करण्यात पुणे पोलिस,अग्निशमन व जिल्हाधिकारी प्रशासनाला अखेर यश आले.
दि.३०/०५/२०१३ रोजी १७/३० चा सुमारास इसम नामे महेंद्र संपत डावकर डावकर रा. सुलतानपुर, ता.जुन्नर जिल्हा असे स्टंट करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याच्या वडिलोपार्जित जमिनी संदर्भात जुन्नर तहसिल कार्यालयात सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये डावखर कुटुंबियांच्या विरोधात निकाल गेल्यामुळे नैराश्यातून महेंद्र याने आत्महत्येची धमकी देत हा स्टंट केला.यावेळी महेंद्र डावखर म्हणाला की,तहसिलदार आणि प्रांत अधिकारी ग्रामस्थांची रखडलेली कामे करत नाहीत. वारंवार भेटून देखील कोणालाही दाद देत नाही. त्यामुळे नैराश्यातून मी हे पाऊल उचलल्याचे त्याने पत्कारांना सांगितले.
सदर ठिकाणी खडकी पोलीस स्टेशनकडील पोलीस स्टाफ व पुणे अग्निशामक दलाचे जवान पाचारण करण्यात आले होते. सदर ठिकाणी पोलीस उप आयुक्त परिमंडळ-४, पुणे शहर शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त खड़की विभाग, श्रीमती आरती बनसोडे, यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस ठाणे पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील, पोउपनि श्री आण्णा गुंजाळ व तहसिलदार बारटक्के, असे सदर व्यक्तीस त्यास कारवाईचे आश्वासन देण्यात आले व तब्बल साडे तीन तासाच्या वेगवेगळ्या पध्दतीने विनंत्या, विनवण्या मार्गदर्शन, समुपदेशन व वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यास १९ / ३० वा. सुखरुप बीजवरती घेण्यात आले आहे.
सदर व्यक्तीस पुढील चौकशीकामी खडकी पोलीस ठाणे येथे आणून सदर व्यक्ती नामे, महेंद्र संपत डावकर हा संचेती येथील इंजिनियरींग कॉलेज चौकातील पुलाचे पिलरवर उभा राहून “तहसिलदार जुन्नर यांचेवर कायदेशिर कारवाई झाली पाहीजे” असा बॅनर होता व सदर बीज वरुन उडी मारुन जिव देण्याची धमकी देत होता त्यावेळी तात्काळ फायरब्रिगेड यांना संपर्क करून बोलावुन व सदर इसमास पिलरवरून बीजवरती घेण्यात आले आहे. सदर इसमाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तसेच जुन्नर येथील तहसिलदार याने त्याचे काम करावे म्हणून त्यांना नुकसान पोहचण्याचा धाक दाखविले म्हणून झालेप्रकाराबाबत सदर इसमांविरुध्द खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. १६९ / २०२३ भा.द.वि. कलम. ३०९, १८९ अन्वये दाखल करण्यात आलेले असुन सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर हे करीत आहेत. व्यक्तीने अशा प्रकारचे चुकीचे कृत्य केलेने त्याचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.