धर्माबाद,दि.२५:- धर्माबाद येथील नामाकिंत असलेल्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचा निकाल घोशीत झाला असून दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी महाविद्यालयाने आपल्या निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाचा सरासरी निकाल 83.52% लागला असून, विज्ञान शाखेचा 97.36% , वाणिज्य शाखेचा 80.73%, कला शाखेचा 63.40% तर एम.सी.व्ही.सी. शाखेतील 61.42% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 21 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले असून 137 प्रथम श्रेणीत आले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे धर्माबाद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण , सचिव डॉ. कमलकिशोर काकाणी, सहसचिव नागभूषण वर्णी, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर कनसे, उप-प्राचार्य डॉ. वाय.एस. जोशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्या प्रा. वसुंधरा वडवळकर, प्रो. शिवाजी पटवारी, प्रा. अमृत वानखेडे, डॉ. दुर्गाप्रसाद रांदड, डॉ. बालाजी श्रीगीरे, प्रा. शेख कासीम, कार्यालयीन अधीक्षक आनंद तोटेवाड , शिक्षक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अभीनंदन केले आहे.
सिध्देश्वर मठपती, धर्माबाद प्रतिनिधी:-