पुणे,दि.१६ : – झुंजार ऑनलाइन – पुण्यातील काही ज्येष्ठ नागरिकांनी कंपनीत गुंतवणुक केल्यास जादा व्याज येण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी रेहान एंटरप्रायजेस कंपनीचे संस्थापक महादेव जाधव व इतर संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत आनंदनगर येथील ६१ वर्षांचे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांनी चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद (गु. रजि. नं. ३२५/२३) दिली आहे. हा प्रकार बाणेर येथील तीर्थ टेन्को स्पेसमध्ये ५ एप्रिल २०२२ पासून आजपर्यंत घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव जाधव व संचालकांनी रेहान एंटरप्रायजेस नावाची कंपनी स्थापन केली.
फिर्यादी, त्यांची पत्नी, मुलगा तसेच व ज्येष्ठ नागरिक यांना त्यांच्या कंपनीत गुंतवणुक केली व
जास्त व्याज देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार त्यांनी ७ लाख ५६ हजार रुपयांची गुंतवणुक केली.
मात्र, त्या गुंतवणूकीवर कोणतेही व्याज न देता, गुंतवलेली रक्कम परत न करता फसवणूक केली.
फिर्यादी यांच्याप्रमाणे इतरांचीही अशीच फसवणूक केली असून आर्थिक गुन्हे शाखेचे
सहायक पोलीस निरीक्षक तोडकरी तपास करीत आहेत.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Shakti Zunzar. To Get Updates on Mobile, Download the Shakti Zunzar Mobile App for Android.
शक्ती झुंजार आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी
Telegram ,
आम्हाला जॉईन करा तसेच, आमच्याआजच Subscribe करा