पुणे,दि.१३:- पुणे महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करणाऱ्या १३२ कनिष्ठ अभियंत्यांच्या तडकाफडकी बदल्या बुधवारी दि.१२ रोजी करण्यात आल्या. पुणे
१३२ कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या केल्या बदल्यांमध्ये स्थापत्य पदावरील १०९, विद्युत पदावरील १७ आणि यांत्रिकी पदावरील सहा कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. या बदल्या करताना प्रत्येक विभागातील बदली योग्य अभियंत्यांपैकी नियमाप्रमाणे ८० टक्के अभियंत्यांची बदली करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या जुन्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये सर्व अभियंत्यांना एकत्रित आणून त्यांच्या मागणी प्राधान्यक्रमानेच बदली करण्यात आली.सर्व अभियंत्यांना बदलीची ऑर्डरदेखील तातडीने दिल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.
उपअभियंते, आरेखक, कार्यकारी अभियंता यांची बदली यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यामुळ पुढील टप्प्यामध्ये लिपिक व अधीक्षक पदावरील बदल्या करण्यात येणार आहेत, असेही इथापे यांनी स्पष्ट केले.यात स्थापत्य, विद्युत; तसेच यांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या. लवकरच अधीक्षक; तसेच लेखनिकांच्या बदल्या केल्या जाणार आहे.पुणे महापालिकेतील वर्ग एक ते तीनमधील कोणत्याही अधिकाऱ्याची तीन वर्षानंतर संबंधित विभागातून बदली करावी, असा कायदा आहे. वर्षानुवर्षे एकाच विभागात राहून संबंधित अधिकाऱ्यांचे तेथे हितसंबंध निर्माण होऊ नयेत, हा यामागचा हेतू होता. मात्र, पुणे महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून अशा बदल्या झालेल्या नाहीत. जवळपास सहा वर्षे बदल्या झाल्या नसल्याचे समोर आले आहे.