पुणे,दि.२८:- पुण्यात एच3एच2 च्या विषाणूने दोघांचा मृत्यू झाला आहे पुण्यातील ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक, तर दुसरी बीडमधील ३७ वर्षीय महिला आहे. गेल्या १३ दिवसांमध्ये हे दोन मृत्यू झाले असून त्यांचा मृत्यू एका खासगी रुग्णालयात झाला आहे. मृत झालेल्या दोघांना सहव्याधी होत्या. एच3एन2 मुळे पुण्यात दोन मृत्यू झाले आहेत.
पुण्यातील ६७ वर्षीय एच3एन2 बाधित ज्येष्ठ नागरिकावर उपचार सुरु होते. त्याला उच्च रक्तदाब आणि मधुमेह होता. त्याचा ११ मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बीडची महिला हडपसर येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. या महिलेचा २३ मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेला ऑटोइम्युन डिसीज, यकृताचा आजार व मेंदूत रक्तस्त्राव झाले होते.पुण्यात एच3एन2 मुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्यांनंतर रुग्णांच्या सखोल परीक्षण करण्यासाठी तज्ज्ञांच्या मृत्यू पडताळणी समितीची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये दोन्ही रुग्णावर करण्यात आलेले उपचार, त्यांच्या मृत्यूचे कारण याचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. त्यावेळी दोघांचाही मृत्यू एच3एन2 मुळे झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला. तसेच सहव्याधीसह हा व्हायरस देखील मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे आढळून आले.