पिंपरी चिंचवड,दि.२७:- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तय हद्दीतील हिंजवडी पोलिस ठाण्याचे भूगाव रोड येथे पोलिसांनी १० लाख रुपये किंमतीचा गुटखा पकडला. या प्रकरणी रामलाल चौगाजी चौधरी (वय ४५, रा. पुणे) या आरोपीला अटक केली आहे. चांदणी चौक भूगाव रोड मार्गे गुटख्याने भरलेला टेम्पो घेऊन तस्करी करीत असल्याची गोपनीय माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पहाटेच्या वेळी या मार्गावर सापळा रचला. सफेद रंगाचा गुटख्याने भरलेला टेम्पो आल्यानंतर त्यास थांबण्याचा इशारा केला असता, चालकाने टेम्पो न थांबवता पळून जाऊ लागला.
पोलिसांनी त्याचा पाठलाग करून भूगाव रोड येथे त्याला ताब्यात घेतले. गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये नऊ लाख ९५ हजार २८८ रुपये किंमतीचा गुटखा आढळला. पोलिसांनी गुटखा व सहा लाखांचा टेम्पो असा एकूण १५ लाख ९५ हजार २८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मनोजकुमार लोहीया सह . पोलीस आयुक्त.डॉ संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त.काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त परि. २, श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग वाकड, यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ. विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक, सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक, अवैध धंदे विरोधी पथकाचे प्रमुख सपोनि अजितकुमार खटाळ, सहा. पोलीस उपनिरीक्षक महेश वायवसे, पोहेकॉ संतोष डामसे, पोहेकॉ सराटे , पोहेकॉ सोमवंशी, पोना हांगे पोलीस अमंलदार रवी पवार, तपास पथक स्टाफ यांनी केली आहे.