पिंपरी चिंचवड,दि.२०:- पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली विरोधीपथकाने केलेल्या कारवाईमध्ये तब्बल ४४ लाख ४२ हजार ४९ रुपयांचा गुटखा जप्त करत ३ आरोपीला अटक केली आहे.हि कारवाई पोलिसांनी रविवारी (दि.१९) रात्री केली आहे.
महेंद्रकुमार कान्हाराम परमार, वय २५ वर्ष.अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
अमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोनि. सतिश पवार, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अमलदार असे मौजे पुनावळे येथील इला सोसायटीच्या परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे व मितेश यादव यांना गोपनीय बातमी मिळाली की, एका पत्राचे शेड मध्ये एका इसमाने लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा विक्री करीता साठवणुक करून ठेवला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्या वरून सदर ठिकाणी छापा टाकला
तिन आरोपीला ताब्यात घेतले.
त्यांच्या कडून ४४ लाख ४२ हजार ४९ रुपयांचा गुटखा जप्त केला.
वेगवेगळया कंपनीचा शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधीत तंबाखु ब पानमसाला व मोबाईल असा माल जप्त करण्यात आला आहे. सदरचा जप्त माल कैलास राठोड व महेंद्र राठोड, लक्ष्मी चौक, हिंजवडी, पुणे मुळगाव राजस्थान याचा असल्याचे सांगितल्याने सदर तीन इसमाविरुध्द रावेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगीरी ही पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहीया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे,पोलीस उप आयुक्त, गुन्हें श्रीमती स्वप्ना गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पदमाकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश पवार, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अगलवार, सपोफी बाळासाहेब सूर्यवंशी, पोहवा प्रदिप शेलार, पो.हवा. संतोष दिघे, पोहया संदीप पाटील पोहचा आनंद बनसोडे, पोना मनोज राठोड, पोना मयुर वाडकर, पोना विजय दौडकर, पोशि रणधीर माने, पोशि मितेश यादव, प्रोशि सदानंद रुद्राक्षे, पोशि अशोक गारगोटे यांनी केली आहे.