पुणे,दि.१७:- पुणे शहरातील बाणेर बालेवाडी परिसरात पुणे महापालिकेच्या वतीने अनधिकृत इमारत व अतिक्रमण नियंत्रण विभाग व बांधकाम विभाग यांनी कारवाई करण्यात आली. ही मोहीम तीव्र करत अनधिकृत इमारतीं सह दुकानासमोरील शेड व अनधिकृत दुकाने काढण्यात आली आहे
अतिक्रमण नियंत्रण विभाग व बांधकाम विभागाचा
मोठ्या फौजफाट्यासह जबर दणका दिला.यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी बाणेर बालेवाडी मधील अनधिकृत सुमारे १४ हजार चौरस फूट अनधिकृत क्षेत्र बांधकाम विकास विभाग व अतिक्रमण नियंत्रण विभाग च्या वतीने मोकळे करण्यात आले.
जेसीबीने पाडण्यात आले.फौजफाटा आणि प्रशासनाचा ‘मूड’ पाहून कारवाईला कोणीही विरोध केला नाही. ही कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता-श्रीकांत वायदंडे, व जयवंत पवार, उपअभियंता उथळे, कनिष्ठ अभियंता- दंडिमे गंगाप्रसाद,व संदेश कुलोवमोडे सहाय्यक- नवीन म्हत्रे, प्राची सर्वगोडे, सूरज शिंदे,
औंध प्रभाग कार्यालयचे धनंजय नेवासे व संकेत गांगुर्डे,
यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सदर कारवाई दहा बिगारी, एक जेसीबी, एक गॅस कटरच्या साहाय्याने पूर्ण करून अनधिकृत इमारतीं सह दुकानासमोरील शेड व अनधिकृत दुकाने पाडण्यात आली. व कारवाईत
कर्मचारी, अतिक्रमण नियंत्रण विभाग तसेच चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी असा फौजफाटा कारवाईवेळी तैनात होता