पुणे,दि.२५ :- पुणे शहर परिसरातील शिवशक्ती चौक,भेकराईनगर, हडपसर,परीसरात बेकायदेशीरपणे एका ठिकाणी काही इसम मटका जुगार खेळत व खेळवत असलेल्या जुगार अड्ड्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.या कारवाईत पोलिसांनी २४ जणांनान ताब्यात घेऊन ६३ हजार ९५० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवार (दि.१४) रोजी केली आहे. हडपसर पोलिस ठाणे हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पाळत ठेऊन पोलिसांनी छापा टाकला असता काही जण पैशांवर जुगार खेळताना आणि खळवत होते. पोलिसांनी ८ जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण ६३ हजार ९५० रुपय किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी २४ जण जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व दोन पाहिजे आरोपी अशा २४ इसमां विरूध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गुरनं. ४२७ / २०२३, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि. अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, बाबा कर्पे, अजय राणे, इरफान पठाण, हणमंत कांबळे, इम्रान नदाफ, संदीप कोळगे, अमित जमदाडे, ओंकार कुंभार या पथकाने यशस्वी केली आहे.